वस्तू संग्रहालयामुळे अकोला पर्यटनाच्या क्षितिजावर

- Events
- Admin
- 25 January 2025
अकोला, ता. २१ : जग झपाट्याने बदलत
आहे. आर्टिफिशीयल इंटलिजन्सच्या या युगात नवीन पिढी मोबाइलच्या आहारी गेली असून, आपल्या पुर्वजांनी अनुभवलेल्या, आपल्या संस्कृतीची ओळख असलेल्या अनेक बाबींपासून ते अनभिज्ञ आहेत. आपल्या संस्कृतीची जपवणूक व्हावी व कधीकाळी लाखमोलाच्या असलेल्या वस्तूंची नवीन पिढीला माहिती व्हावी याकरिता दीप पुरातून वस्तू संग्रहालय सुरू रण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. नागपूर येथील आर्किटेक संदीप कांबळे व अकोला येथील प्रदीप नंद तथा डॉ. माधव देशमुख यांनी गत २० वर्षांमध्ये जगभरातून या वस्तू गोळा केल्या आहेत.
ग्रामोफोनवर ऐकता येणार गाणे
आता मोबाइलमध्ये चित्रपटातील तसेच विविध गाणे आपण एकतो. मात्र, पूर्वी ग्रामोफोनवर गाणे ऐकण्यात येत होते. ते ग्रामोफोन सुद्धा या ठिकाणी आहे. येथे ग्रामोफोनपासून पेनड्राइव्हवर गाणे ऐकण्यापर्यंत जो प्रवास झाला, त्यादरम्यान गाणे ऐकण्याकरिता वापरण्यात येणारे रेडीओ, सीडी प्लेअर, व्हीसीआर सुद्धा येथे संग्रहीत करून ठेणण्यात आला आहे. या ठिकाणी स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंतच्या ३५०० रेकॉर्ड (कॅसेट) चे संकलन करण्यात आले आहे.
मध्ययुगीन बैठक व्यवस्थेचे दर्शन
या ठिकाणी शिवकालीन बैठक व्यवस्था कशी होती. किल्ल्यांमध्ये, वाडे, हवेल्यांमध्ये बैठक व्यवस्था कशी होती, ते बघायला मिळते. तसेच पेशवेकालीन बैठक व्यवस्था कशी होती, याचेही दर्शन होते. बैठक घरात लावण्यात येणारे दिवे, कंदिल, झुंबरही या ठिकाणी आहेत.
गत काही वर्षांपासून नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून, सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहेत. नवनवीन शोध लागत असल्याने काळाच्या ओघात कालबाह्य झालेल्या
पुरातन वस्तू अडगळीत टाकून देण्यात येत आहेत. मात्र, कधीकाळी मानवी जीवनाचा भाग असलेल्या या वस्तू अनमोल आहेत. त्यामुळे त्यांचे
महत्व ओळखून दीप पुरातन वस्तू ग्रामोफोन
संग्रहालय साकारण्यात आले आहे. नागपूर रोडवर असलेल्या बाभुळगाव येथील नंद पेट्रोलियमच्या बाजूलाया संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा अनमोल ठेवा
सर्वांच्या अवलोकनासाठी खुला असणार आहे. याठिकाणी जगभरातील राज्यकर्त्यांची सांस्कृतिक प्रतीके, देशभरातील कलाक्षेत्रांचे प्रतिबिंब या ठिकाणी बघायला मिळणार आहे.
आपल्या पूर्वजांचा अनमोल ठेवा
अकोला : संग्रहालयात ठेवण्यात आलेली तथागत गौतम बुद्धांची मूर्ती.
शिवकालीन शस्त्रांचा संग्रह
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात युद्धात वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांचा संग्रह या ठिकाणी करण्यात आला आहे. शिवकाळात युद्धामध्ये जी शस्त्र वापरण्यात येत होते, ती या ठिकाणी बघायला मिळतात. तसेच
बुद्धादरम्यान वापरण्यात येणारे चिलखत सुद्धा येथे आहे. पुरातन काळातील तलवारींचाही संग्रह येथे बघायला मिळतो. व जुन्या काळातील कुलपांचे प्रकार सुद्धा आहेत.
याठिकाणी संग्रहीत करण्यात आला आहे. जहाजांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तूंपासून तर घरगुती भांडयांपर्यंतच्या पुरातन वस्तू या ठिकाणी आहेत. जगभरात विविध देशात प्राचीन
काळापासून चलनात असलेले नाणे व नोटा सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतात. येथे आल्यावर पर्यटक, अभ्यासक निश्चितच पुरातन काळात हरवून जातो.