मानवी अंत: प्रेरणा जिवंत ठेवण्यासाठी दीप संग्रहालय दिशादर्शक - अॅड प्रकाश आंबेडकर

- Events
- Admin
- 25 January 2025
दीप पुरातन वास्तु संग्रहालयाचे झाले उदघाटन, प्रदीप नंद व डॉ. माधव देशमुख यांचा उपक्रम
अकोला: मानवी अंतःप्रेरणा अर्थात ह्युमन इंस्टीकट जिवंत ठेवण्यासाठी दीप पुरातन वास्तु संग्रहालय मोलाचे काम करेल. असा दृढ विश्वास वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. अकोला- नागपूर महामार्गावरील बाभुळगाव जवळ असलेल्या नंद पेट्रोल पंपाच्या बाजूला नागपूर येथील आर्किटेक्ट संदीप कांबळे, यांच्या संकल्पनेतून व अकोला येथील रियल इस्टेट व्यवसायिक प्रदीप नंद यांच्या अमूल्य सहकार्याने उभारण्यात आलेल्या दीप पुरातन वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन सोमवार २० जानेवारी रोजी अँड प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना अॅड. आंबेडकर यांनी जगात ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे संशोधन, जिज्ञासा आणि मागोवा या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीत असलेली चिकित्सक आणि जिज्ञासू वृत्ती लुप्त होत आहे. काळानुरूप होत असलेले बदल स्विकारणे आवश्यक असले तरी एका क्लिकवर हवी ती माहिती
उपलब्ध होत असल्याने बुध्दीला
चालना मिळेनाशी झाली
आहे. असा परखड विचार अँड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. बुध्दीची भूक भागविण्यासाठी, त्याच बरोबर लहान मुलांचे युवकांचे कुतूहल जागृत करण्यासाठी जिवंत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे वास्तु संग्रहालय आणि व्हिडीओ स्वरुपात त्याची माहिती उपलब्ध झाल्यास मोठी मदत समाजाला होणार असल्याचे अॅड. आंबेडकर म्हणाले.
भारतासह जगात आजवर अस्तित्वात आलेल्या निर्मितीत टप्प्या टप्प्याने बदल होत गेल्याने, मुळ निर्मिती उपयोग शून्य झाली. आजच्या पिढीला दिसत
असलेल्या प्रत्येक प्रतिकृती किंवा वस्तूचे मुळ रूप / स्वरूपात प्रत्यक्ष घेणं अनुभव अशक्य होत असताना, अकोला येथे तयार करण्यात आलेले दीप पुरातन वस्तू संग्रहालय हे प्राचीन संस्कृती व संशोधन जोपासत, आजच्या व येणाऱ्या पिढीसाठी अनमोल ठेवा आहे. असं
अकोल्याच्या विकास करण्यात काहींना दृष्टी आहे. असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी ज्यांना विकासाची दृष्टी नाही त्यांच्यावर टिका केली. अकोला शहराला भकास स्वरूप आले असून शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत जाणारी 'नदी' असलेल्या शहरांपैकी अकोला हे एक आहे. इतर शहरांनी अशा नदीला वेगळे सौंदर्य देऊन विकास घडवून आणला. मात्र अकोल्यातील मोर्णा नदीच्या दोन्ही काठावर भरपूर जागा असताना देखील या जागेचा विकास करण्याची इच्छाशक्ती नसल्याने मोर्णा नदी लयास जाऊन मोठे नाले झाले आहे. अशा विदारक चित्र दिसत असताना, कलेची पारख आणि पुरातन ठेवा जोपासण्याचा वृत्तीमुळे प्रदीप नंद, माधव देशमुख यांनी या शहराचा विकास व वैभवात भर घालणारे संग्रहालय उभारून एक दिशा दिली आहे. येथेच न थांबता यात अधिक भर घालावी. या कामासाठी आपण सदैव त्यांच्या सोबत आहोत, असं आवाहन अँड आंबेडकर यांनी केले.
प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. अॅड. आंबेडकर पुढे म्हणाले की, नवनवीन तंत्रज्ञानाचे विकासाच्या कक्षा रुंदावत असून नवीन पिढीसोबत आर्टिफिशीयल इंटेलिजन्स आल्याने पुर्वजांनी केलेले संशोधन, त्यात वेळोवेळी झालेल्या सुधारणा, मुळ संस्कृतीसोबत जीवनशैलीत होत गेलेले बदल आणि आपली जगात ज्यामुळे ओळख झाली, अशा अनेक बाबींपासून ते अनभिज्ञ आहेत.
संस्कृतीची जपवणूक व्हावी
व कधीकाळी लाखमोलाच्या असलेल्या वस्तूंची नवीन पिढीला माहिती व्हावी याकरिता, प्रत्येक जिल्ह्यात दीप पुरातून वस्तू संग्रहालयासारखे संग्रहालय सुरू करण्यात यावे, असं आंबेडकर यांनी सांगितले.
दीप पुरातन वस्तू संग्रहालय उभारण्यात आपला वाटा देणाऱ्यांचा या प्रसंगी आंबेडकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन
सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर बाळासाहेब आंबेडकर, आर्किटेक्ट संदीप कांबळे, प्रदीप नंद, डॉ. माधव देशमुख विराजमान होते.
कार्यक्रमाला उद्योजक राजीव बियाणी, नीलेश देव, गोपी ठाकरे, प्रास्ताविकात डॉ.
देशमुख यांनी, संग्रहालयाची संकल्पना, पुरातन वस्तू गोळा करण्यासाठी केलेले परिश्रम आणि लोकांनी घेतलेला सहभाग याबाबत सविस्तर माहिती दिली. आर्किटेक्ट संदीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्यांच्या विचार आणि कल्पना साकार करण्यासाठी नंद यांनी लाखमोलाची साथ दिली. यामुळे हे शक्य झाले. जेष्ठ छायाचित्रकार विजय मोहरील यांनी आभार मानले.